प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपुर शहर मध्ये महानाट्य आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्य मुंबई येथिल गोल्डमैन डॉ. रोहित पिसाल यांचे चंद्रपुर शहरामध्ये स्वागत करण्याकरीता सामाजिक कार्यकर्ता नकुल कांबले, मानसी बद्रे, सांझ बद्रे, प्रणीत तोड़े यांनी शॉल आणि पुष्यगुच्छा देऊन त्यांचे स्वागत केले.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धम् शरणम् गच्छामी” हे महानाट्य चंद्रपूर मध्ये होणार आहे. अभ्युदय आर्ट अकॅडमी नलगोंडा तेलंगणा द्वारा प्रस्तुत या महानाट्याचा १०१ वा प्रयोग ब्लॅकगोल्ड सिटी चंद्रपूर मध्ये साकारणार आले. संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवनिमित्त संविधान निर्मितीची त्याग व संघर्षाची गाथा या महानाट्यातून बघायला मिडाली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून तर महापरिनिर्वानापर्यंत बुद्ध धम्माची दीक्षा व अनेक जीवनातील संघर्षमय गाथा या महानाट्यातून उद्रेक झालेले आहेत. चंद्रपूर मध्ये होत असलेल्या या महानाट्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कितींचे ख्यातनाम बुद्धिस्ट, गोल्डमॅन डॉ. रोहित पिसाळ यांची विशेष उपस्थिती होती.

