prabodhini news logo
Home गडचिरोली गडचिरोली येथे रविवारी जत्रा घडली नागोबाची महानाट्याचे प्रकाशन

गडचिरोली येथे रविवारी जत्रा घडली नागोबाची महानाट्याचे प्रकाशन

0
203

नाट्यश्री उत्कृष्ट कवी पुरस्कार वितरण व कविसंमेलनही होणार.

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – स्थानिक ‘नाट्यश्री’ च्या वतीने झाडीपट्टीतील नाटककार “चुडाराम बल्हारपुरे” लिखीत व मधुश्री प्रकाशन, पुणे प्रकाशित “जत्रा घडली नागोबाची” या महानाट्याच्या पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण येत्या रविवारी १८ तारखेस नागपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ रंगकर्मी व समिक्षक डॉ. बळवंत भोयर यांचे हस्ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, गडचिरोली येथील सभागृहात संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ रंगकर्मी प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर हे राहणार असून, प्रसिद्ध साहित्यिक व संशोधक पांडुरंग सोनवणे, पोलिस उप अधीक्षक, नागपूर हे प्रमुख अतिथी म्हणून हजर राहणार आहेत.
प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, सिंदेवाही हे नाट्य समीक्षण करणार आहेत.
या प्रसंगी जत्रा घडली नागोबाची महानाट्यातील ज्येष्ठ कलावंत दादा सुंदरकर, जयदेव सोमनाथे, गुलाम कुरेशी, प्रकाश गाठे, प्रा. यादव गहाणे, वासुकुमार मेश्राम, व इतर कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
नाट्यश्रीचे कलावंत व संगीतकार प्रकाश गाठे, विठ्ठल खानोरकर, दिवाकर बारसागडे, विजया पोगडे, केवल बगमारे हे महामृत्युंजय मार्कंडेश्वर या नाटकातील नांदी, स्वागतगीत व “जत्रा घडली नागोबाची ” या नाटकातील नाट्यगीते सादर करणार आहेत.
या निमित्ताने नाट्यश्रीने सन २०२४ मध्ये वर्षभर घेतलेल्या नाट्यश्री उत्कृष्ट कवी व कविता या उपक्रमांतर्गत ५० सत्रातील ६० पुरस्कृत कवींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय कवींचे कविसंमेलनही घेण्यात येणार असून मुंबई , कोल्हापूर, नाशिक, लोणार सरोवर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा , गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील ७० कवी सहभागी झालेले आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त कवी, साहित्यिक व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्यश्री चे दादा सुंदरकर, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे, योगेश गोहणे, प्रा. अरुण बुरे, मारोती लाकडे, निरंजन भरडकर, प्रभाकर गडपायले, राजेंद्र जरुरकर, गुणवंत शेंडे व कुंदा बल्हारपूरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here