आलापल्ली येथील गोदाम व्यवस्थापक राजेश ताकवले यांच्यावर गुन्हा दाखल….

0
143

तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583

अहेरी : शासकीय गोदामातून धान्य अपहारप्रकरणी व्यवस्थापक ताकवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून रास्त भाव दुकानदारांना धान्य पुरवठा करणाऱ्या गोदामातून अपुरा धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. याबाबत शासकीय धान्य गोदामातून गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून धान्याची चोरी होत असल्याची माहिती हाती लागली होती. त्यामुळे वेलगुर रोडवरील शासकीय धान्य गोदामातील हजारो क्विंटलवर धान्य चोरीला गेले, अशी तक्रार अहेरी पोलिस स्टेशनला करण्यात आली होती. त्यानुसार शासकीय गोदामातील अपहार व धान्य घोटाळा प्रकरणी व्यवस्थापक ताकवले यांच्यावर अहेरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here