दत्तात्रय घुले कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे नुकतेच ग्रामपंचायत कार्यालय सभागृह या ठिकाणी तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या समस्येचे निवारण करण्याचे उद्देशाने तसेच आभार दौरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते.या मध्ये गावातील जल सिंचन प्रकल्प योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी उपाययोजना , इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल , वाड्या वस्त्यांवरील रस्ता बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन लवकरात लवकर काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी चर्चासत्र करण्यातआले. मांजरे वस्ती येथील जिल्हापरिषदेच्या शाळेच्या खोल्यांची कामे तसेच आ.आशुतोष काळे यांनी अधिका-यांना सुचना केल्या कि,गावातील मतदार संघातील नागरिकांचे शासकीय कार्यालयातील कामे खोळंबून राहु नयेत या साठी जनता दरबार सुरू करण्यातआले आहे.गावातील नागरिकांचे गावाअंतर्गत अनेक कामे रखडलेली असतात कामे पुर्ण होण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे एकाच वेळी सांगा कागदपत्रांच्या आडून नागरीकांना त्रास होऊ देवु नका नागरिकांचे गावातील प्रश्न अडी अडचणी वेळेतच सुटले पाहिजे याची काळजी घ्या अशा सुचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या.या वेळी कोपरगाव गट विकास अधिकारी संदिप दळवी नायक तहसीलदार चंद्रशेखर कुलथे पुरवठा अधिकारी अमोल फोफसे महावितरणच्या सहाय्यक अभिय॔ता रंजना करसाळे युनियन बॅंक ब्रॅच अधिकारी प्रमोद पुरी विस्तार अधिकारी बबन वाघमोडे धामोरी येथील पोलीस पाटील सौ.संगिताताई ताजणे,गुरूदत्त पतसंस्थेचे संस्थापक ज्ञानदेव मांजरे,नारायण मांजरे ,चंद्रशेखर कुलकर्णी,बाजीराव मांजरे,विजयराव जाधव ,अशोकराव भाकरे ,राहुल वाणी ,विलासराव भाकरे ,बंडुनाना भाकरे ,सुनील राव वाणी ,भास्करराव मांजरे,सुनील मांजरे ,मनोज जगझाप, चंद्रशेखर कडवे आदी कार्यक्रते व धामोरी येथील व्यावसायीक व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थितीत होते.

