prabodhini news logo
Home ठळक बातम्या येवला तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महिला दिननिमित्त महिला पोलीस पाटील व...

येवला तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महिला दिननिमित्त महिला पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांचा सन्मान

0
117

येवला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – येवला ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंडलिक साहेब पीएसआय बहिर साहेब यांच्या संकल्पनेतून व पोलीस पाटील संघ महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्ष येवला तालुका भगवान सावळे, राज्य प्रसिद्धीप्रमुख मारुती पिनघट ,जिल्हा उपाध्यक्ष मुजम्मील चौधरी पोलीस पाटील पाटोदा ,जिल्हा संघटक दत्तात्रय आहेर तालुक्यातले चौरस पोलीस पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील महिला पोलीस पाटील व महिला पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांचा महिला जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला.

यावेळेस उत्कृष्ट कार्य केलेले पाच महिला भगिनी पोलीस पाटील यांना पोलीस पाटील संघातर्फे सन्मानचिन्ह पोलीस विभाग विभागातर्फे प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले याव्यतिरिक्त प्रत्येक पोलीस पाटील भगिनींना प्रशस्तीपत्रक शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोची सत्कार करण्यात आला यावेळी वंदना राऊत प्रीती सोनवणे सविता गायकवाड मुरकुटे मॅडम राजपूत मॅडम इत्यादी महिला पोलीस पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस हवलदार रणधीरे मॅडम ह्या होत्या यावेळेस कदम मॅडम ढाकणे मॅडम महाजन मॅडम वाघ मॅडम रणधीरे मॅडम निकम मॅडम जाधव मॅडम गुजर मॅडम इत्यादींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गोपनीय चे पिंपळे दादा मोरे दादा पवार दादा संसारी जाधव ताडगे हेंबाडे ठोंबरे पल्हाड दादा इत्यादींनी व्यवस्थितपणे प्रयत्न केले सूत्रसंचालन उंदीर वाडी चा पोलीस पाटील वंदना राऊत तर आभार प्रदर्शन पाटोदा गावचे पोलीस पाटील व जिल्हा उपाध्यक्ष मुज्जम्मीलचौधरी यांनी मानले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here