काय एवढी घाई आहे
स्वतःकडे बघ ना
आयुष्य सरून चाललंय
स्वतःसाठी जग ना .
लेक सून नातवंड
यात अडकून नको बसू
दुःख लपवताना
पदर घेऊन पुसते असू
धुनं भांडी चहा पाणी
हे तुझे जग नाही
आयुष्य खूप सुंदर आहे
थोडं जगून घे ना .
दिवस चालले सरून
स्वतःकडे लक्ष दे ना.
सुखदुःखाचा हा खेळ
जशी ऊन आणि सावली
मनासारखं जगताना
खूप विचार करते ही माऊली
एक दिवस तरी
मैत्रिणी सोबत बस ना.
आठवणींच्या हिंदोळ्यात
सुंदर जग बघ ना.
माझं घर माझं कुटुंब
यात अडकून बसू नको
स्वाभिमान जपून ठेव
वेद मनाचा घेऊ नको
जगणं सुंदर होण्यासाठी
स्वतःला वेळ दे ना
मन मोकळं करण्यासाठी
या मैत्रिणीला शिळ तू दे ना
खूप दिवस झाले
अजून तू भेटली नाही
वडाच्या झाडाखाली
वाट बघते हि माही.
थोड्या वेळासाठी
लहान आपण होऊ ना.
चाँकलेट बिस्कीट
वाटुन आपण खाऊ ना
महिला आहोत आपण
आपणच आपलं जगणं होऊ
सुखदुःखाच्या प्रवाहात
एकमेकींना आधार देऊ.
जबाबदाऱ्याच्या ओझ्यापासून
थोडं दूर जाऊ ना
सुंदर जग आहे
आनंदाने जगून घेऊ ना.
सौ. भारती वसंत वाघमारे
आंबेगाव

