prabodhini news logo
Home ठळक बातम्या सहा वर्षीय अनाबिया समीर नवाज ने ठेवला रोजा

सहा वर्षीय अनाबिया समीर नवाज ने ठेवला रोजा

0
94

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा- सर्व मुस्लिम बांधवांना रोजा (उपवास) ठेवणे गरजेचे आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात रोजा (उपवास) पकडणे कठीण असते. तरी सुद्धा भंडारा येथील टंडन वार्डातील अनाबिया समीर नवाज (वय ६ वर्षे) यांनी रोजा (उपवास) ठेवला होता. इस्लाम धर्मात कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे.

यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजा (उपवास) करतात. मात्र सहा ते सात वर्षांपेक्षा लहान मुले रोजा (उपवास) क्वचित करित असतात. मात्र अनाबिया हिने पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो पुर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी अनाबिया नवाज हिला नवीन कपडे, हार घालण्यात आले होते. तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनाबिया या चिमुकलीने केलेल्या नमाजाचे मुस्लिम व हिंदू समाज बांधवांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे. ती इनेव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूल खात रोड भंडारा येथे पहिल्या वर्गात शिकत आहे.

रोजा (उपवास) ठेवल्याबद्दल आजोबा हाजी मोहम्मद शरिफ शेख, तीची आई फराह शेख, वडील समीर वर्ड कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज, आजी रेहाना बेगम शेख, नाना रियाज खान, नानी रेहाना खान, इनेव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूलचे नजाहत परवेज खान ( बाबुभाई) मुख्याध्यापिका ज्योती माकोळे, भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार कु. प्राची चटप, प्रा. शाहनवाज शेख, अपर्णा लिमजे, लीना गांधी, रूमा कलेक्शनचे संचालक तौसिफ शेख, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य विलास केजरकर, रूमा शेख, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रदीप काटेखाये, रूशान शेख, शायान शेख, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, अरशान शेख, यशवंत बिरे, रोहाण शेख, नंदगोपाल फाऊंडेशनचे संचालक डॉ. यशवंत लांजेवार, अबुजन शेख व चाहत्यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here