तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583
अहेरी तालुक्यातील मोदुमोडगू येथील शासकीय धान्य गोदामातून 22 लाखांवर तांदूळ आणि गव्हाचा अपहार केल्याप्रकरणी, अहेरी तहसिल कार्यालयातील निरीक्षण अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारअंती पोलिसांनी या गैरव्यवहार प्रकरणी पाच जणाना जेरबंद केले आहे. आरोपींमध्ये गोदाम व्यवस्थापक राजेश देविदास ताकवाले (55) रा. नाशिक, ट्रकचालक असलेले महेश रामभाऊ कांबळे (27), उमाकांत विश्वनाथ नरुले (28), सुरज आनंदराव मोदूमोडगू गोदामात 22 लाख 46 हजारांचा गैरव्यवहार झारली (22) तिघेही रा. किटाळी ता. आप्तमोरी व पंकज मनिंद्र हालदार (30) रा. सुंदरनगर यांचे समावेश आहे.
अहेरी येथील तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकारी व्यंकटराव वैरागडे यांना तहसिल कार्यालयांतर्गत येत असलेल्या, मोटूमोडगू येथील शासकीय धान्य गोदामातून 16 लाख रुपये किंमतीचे 562.66 क्विं. तांदूळ आणि 6 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 159 क्विं. गहु तपासणीदरम्यान कमी आढळून आले. यात एकूण 22 लाख 46 हजार रुपयांच्या धान्याची अफरातफर झाल्याचे निदर्शनास आले. याची तक्रार वैरागडे यांनी अहेरी पोलिस ठाण्यात दिली. याअंतर्गत अहेरीचे पोलिस निरीक्षक स्वप्निल ईअपवार यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक करिश्मा मोरे यांनी तपासाअंती गोदाम व्यवस्थापक राजेश ताकवले यांच्यासह अन्य चौघांना अटक केली. यातील आरोपी राजेश ताकवले याची न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे. धान्य अफरातफर प्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली असून, यात आणखी काही मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे.

