prabodhini news logo
Home कोपरगाव आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्चच्या अनुषंगाने ग्रामपंचायत मध्ये महिला सभा संपन्न

आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्चच्या अनुषंगाने ग्रामपंचायत मध्ये महिला सभा संपन्न

0
254

कोपरगाव शहर प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे 7744022677

कोपरगाव चासनळी ग्रामपंचायत विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिवस आठ मार्च या अनुषंगाने महिला सभेचे आयोजन करण्यात आले. महिलांना सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या महिला दिनानिमित्त स्त्री पुरुष समानतेचा संघर्ष समजून घेण्यासाठी आणि महिलाचे योगदान ओळखण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी आणि भविष्यातील कृती संकल्पना मांडण्यासाठी राष्ट्रीय महिला दिवस एक हक्काचे व्यासपीठ म्हणून काम करतो. तसेच या सभेमध्ये ग्रामपंचायत मार्फत महिलांना घरकुला विषयी 2 टप्पा याविषयी वाचन करण्यात आले. तसेच या सभेमध्ये अंगणवाडी सेविका ही उपस्थित होत्या. व तसेच आरोग्य केंद्र चासनळी येथील डॉक्टर स्टाफ उपस्थित राहून महिलांना आरोग्यविषयक माहिती दिली.
त्यावेळेस ग्रामपंचायत सरपंच. सदस्य. व ग्रामस्थ कर्मचारी महिला मंडळ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here