रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या १३ व्या शाखेचे उदघाट्न;कमला नेहरू हॉस्पिटल समोर संपन्न

0
86

कमरेचा बॉल बसवणे आणि गुडघ्यांच्या वाट्या बदलण्याचे ऑपरेशन होणार मोफत!

प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, पुणे दि. ११ मार्च – रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर सरचिटणीस शारदा गजानन लडकत यांचे नेतृत्वाखाली आणि शाखाध्यक्ष गौरी मुकुंद चव्हाण यांच्या पुढाकाराने आज मंगळवार पेठ येथील कमला नेहरू हॉस्पिटल समोर, रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या १३ व्या शाखेचे उद्घाटन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे शहर सचिव प्रभा अवलेलू, संघटक रेश्मा जांभळे, पुणे शहर सदस्य दिलीप ओव्हाळ, गजानन लडकत, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद चव्हाण, कार्यालयीन सचिव अमृता जाधव आणि परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये प्रमुख उपस्थित होत्या.
यावेळी स्थानिक माता भगिनी व नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
१३ व्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनानिमित्त गुडघ्याच्या वाट्या बदलणे आणि बसवण्याचे ऑपरेशन तसेच कमरेचा बॉल बदलणे आणि बसवण्याचे ऑपरेशन शासकीय योजनांमधून मोफत केले जाणार आहेत. यासाठी 8956185702 या क्रमांकावर रुग्णांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन पुणे शहर सरचिटणीस शारदा लडकत यांनी केले. तसेच सदर ऑपरेशन पुण्यातील शनिवार वाडा जवळील युनिव्हर्सल हॉस्पिटल येथे करण्यात येतील, अशी माहिती रेश्मा जांभळे आणि प्रभा अवलेलू यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here