prabodhini news logo
Home चंद्रपूर गुडसेला युवकांनी जाळली देशी दारू व तंबाखू ची होळी

गुडसेला युवकांनी जाळली देशी दारू व तंबाखू ची होळी

0
97

व्यसनमुक्ती उपक्रम

जिवती प्रतिंनिधी – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.या भूमीत अनेक संत जन्माला आले त्यांनी मानव जातीच्या उत्थानासाठी त्यांनी प्रयत्न केले.मात्र दिवसेंदिवस समाज व्यसनामुळे खराब होताना दिसत आहे.गावागावात अल्पवयीन मुले व्यसनाच्या नादी लागत आहेत. खर्रा,तंबाखू,दारू मुळे कित्तेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.ही वाईट प्रथा समाजातून दूर व्हावी या हेतूने गावातील युवकांनी पुढाकार घेऊन गावातून गल्लोगली फिरून रिकाम्या देशी दारूच्या बाटली व तंबाखू,बिड्या, खर्र्याच्या पन्नी गोळा करून गावातील मुख्य चौकात या वस्तूंची होळी पेटवली. त्यापूर्वी गावात फेरी घेऊन व्यसन मुक्ती आधारित नारे देण्यात आले.तसेच श्रीकांत राजपंगे यांनी व्यसन मुक्ती वरील गीते सादर केली. यावेळी गावातील विष्णू वाघमारे,मारोती कांबळे,सुनील कुंटेवाड,सुरेश वाघमारे,प्रशांत मोरे,तिरुपती बटवाडे,विजय कांबळे,मारोती वाघमारे, परमेश्वर केसरे,विनोद कांबळे,रोशन दासरे,दत्ता कुंटेवाड , केराबाई भोगे, भुरुबाई बटवाडे मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here