शासन निर्णयाचा निषेध म्हणून महा.राज्य पत्रकार संघा कडून काळ्या फिती लावून लेखणीबंद आंदोलन

0
54

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी, वाशिम : महाराष्ट्र सरकारने वृत्तवाहिन्या,वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्यांचे संकलन व विश्लेषण करण्याचे काम खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून, माध्यम स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणारा आहे. हा जुलमी निर्णय मागे घेण्यासाठी बुधवार ता. 12 मार्च 2025 रोजी वाशिम येथे जिल्हाधिकाऱ्यांना,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व संपूर्ण वाशिम जिल्ह्याच्या वतीने काळ्या फिती लावून, संघटनेच्या पत्रकारांनी निवेदन दिले. हा जुलूमी निर्णय मागे न घेतल्याने, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यात तिव्र असे लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी आपल्या लेखणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मॅडम यांचेकडे सुपूर्द करीत, संपूर्ण दिवसभर लेखणी बंद आंदोलन केले.

“पत्रकारितेचा मुख्य हेतू जनतेपर्यंत सत्य व वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणे हा आहे. मात्र,केन्द्र व राज्य सरकारकडून पत्रकारितेवर लक्ष्य ठेवण्यासाठी शासनाची जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाची यंत्रणा असतांना देखील, या कामासाठी खासगी संस्था नेमण्याचा निर्णय घेतल्याने,बातम्यांवर खाजगी संस्थाद्वारे अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका आहे. हा निर्णय सरकारविरोधी मतप्रवाह दडपण्याचा आणि प्रसारमाध्यमांवर जुलूमी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे देशाच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि पत्रकारितेच्या स्वतंत्र भूमिकेचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांनी या जुलूमी आणि असंवैधानिक निर्णयाला तीव्र विरोध करण्याची भूमीका घेतली आहे.सरकारने पारदर्शकता न ठेवता खासगी संस्थेला हे काम सोपवणे म्हणजे माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न आहे. सरकार कडून लादली गेलेली ही अघोषित आणीबाणी त्वरित मागे न घेतल्यास बुधवार दि. 12 मार्च 2025 रोजी,राज्य संघटक संजय भोकरे,प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकोडे,प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी,सरचिटणीस विश्वासराव आरोटे,राज्य समन्वयक वैभव स्वामी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे संवेदशील आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते स्व.यशवंतराव चव्हाण ( महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री) यांच्या जयंती दिनी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तर्फे राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन व निदर्शने करण्यात आली. पत्रकारांवर असंवैधानिक व जुलूमी खाजगी यंत्रणा लादण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडू नये, राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करून खाजगी संस्थेमार्फत मीडिया मॉनिटरिंग करण्याचा घेतलेला चुकीचा व असंवैधानिक असलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा.अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांनी केली सदर आंदोलनात, विदर्भ कार्याध्यक्ष अभय खेडकर,अमरावती विभागीय अध्यक्ष सुनील फुलारी,विदर्भ उपाध्यक्ष संजय कडोळे जिल्हाध्यक्ष किरण क्षार, शहर जिल्हाध्यक्ष विनोद तायडे, वाशिम शहराध्यक्ष पप्पू घुगे,डिजिटल मिडिया समितीचे जिल्हाध्यक्ष संजय खडसे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष गणेश देगावकर,इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष राम धनगर, राजकुमार पडघान,धनंजय काकडे, जगदीश देशमुख,भाई जगदीश इंगळे,शाहीर उत्तम ओंकार इंगोले,भास्कर गायकवाड विदर्भ समन्वयक मोहित कर्नावत,पत्रकार श्याम सवाई, मानोरा ग्रामिणचे अध्यक्ष लोमेश पाटील चौधरी यांचे समवेत पदाधिकारी पत्रकार सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here