तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका- कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त व्हिजन मनी मंत्रा तर्फे ११ मार्च रोजी रोटरी सभागृहात विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमात साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल रोहिणी अमोल पराडकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रमुख उपस्थितीमध्ये भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष मा. अरुंधती महाडिक वहिनी आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. कविता शाह होत्या.
या वेळी आपल्या भाषणात अरुंधती महाडिक म्हणाल्या, “महिलांनी तणावमुक्त जीवन जगले पाहिजे, तरच त्या कुटुंबाची आणि स्वतःची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकतात. महिलांनी आर्थिक साक्षरतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित राहील.”
या विशेष कार्यक्रमाचे आयोजन व्हिजन मनी मंत्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने करण्यात आले. अमित शहा, दर्शना शहा आणि रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेचा प्रसार आणि सुरक्षित गुंतवणुकीबाबत जनजागृती करण्याचे कार्य करत आहे.
या कार्यक्रमात सी.ए. अमित शहा यांनी महिलांसाठी गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन यावर व्याख्यान दिले. अनेक क्षेत्रातील कर्तबगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रोहिणी अमोल पराडकर यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

