प्रा.नानाजी रामटेके यांची “राज्यस्तरीय मराठी साहित्य सम्राट” पुरस्कारासाठी निवड

0
103

आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिनांक १६ मार्च २०२५ रोजी औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या दैनिक साहित्यसेवा वृत्तपत्राच्या तिसऱ्या वर्धापन दिनी आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलनात प्रा.नानाजी रामटेके यांना राज्यस्तरीय साहित्य सम्राट या पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यांनी केलेल्या साहित्यीक ,सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे.यापूर्वी प्रा.नानाजी रामटेके लेखक ,कवी ,विचारवंत समीक्षक,उत्तम ग्राफिक्सकार आहेत.यांना यापूर्वी राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार ,राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.सध्या ते साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र या समुहाचे समूह संस्थापक ,समीक्षक , ग्राफिक्सकार आहेत.तसेच कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा ( ठाणेगाव ) तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे इंग्रजी भाषा विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल गोंडवन विकास संस्था नागभीड जिल्हा चंद्रपूरचे सचिव रविंद्र जनवार ,प्राचार्य सुनील मेश्राम, पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे,प्रा.मनोज आलबनकर,प्रा.विनोद कुनघाडकर भास्कर उरकुडे सर्व व शिक्षकेत्तर कर्मचारी कर्मवीर विद्यालय वासाळा (ठाणेगाव) कल्पना टेंभूर्णीकर नागपूर, मधुकर गोपनारायण नागपूर,सीताराम नरके पुणे, निता मनिष बागुल नाशिक,डॉ.हरिश्चंद्र धिवार, मुंबई, माला मेश्राम नवी मुंबई,नरेंद्र अनंत पवार मुंबई ,प्राचार्य सुनील थोरात पुणे,मीरा वासनिक, कल्याण,रूपाली निखारे नागपूर,सुप्रिया जाधव संपादिका दैनिक साहित्यतेज औरंगाबाद, मदन रामटेके फोटोग्राफर ब्रम्हपुरी, अशोक शामकुळे वासाळा(आरमोरी) शशिकांत लांडगे देसाईगंज वडसा, संजयकुमार गेडाम गोंदिया, प्रांजली प्रविण काळबेंडे आदींनी अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल त्यांचेवर परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here