चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाच्या समस्ये विरोधात आ. मुनगंटीवार यांनी उपसले संसदीय ब्रम्हास्त्र

0
69

नागरिकांचा विनंती अर्ज विधानसभा विनंती अर्ज समितीकडे सादर

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिंनिधी चंद्रपुर – चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. च्या कोळसा खाणीमुळे तसेच जिल्ह्यातील उद्योगांमुळे होणाऱ्या जल व वायू प्रदूषणाच्या समस्ये संदर्भात जिल्ह्यातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रम्हास्त्र उपसले आहे. विधानसभेतील विविध संसदीय आयुधांमध्ये सर्वात महत्वाचे अर्थात ब्रम्हास्त्रसमजले जाणारे आयुध म्हणजे विधानसभा विनंती अर्ज.

चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. च्या कोळसा खाणीमुळे तसेच जिल्ह्यातील उद्योगांमुळे होणाऱ्या जल व वायू प्रदूषणावर प्रतिबंध घालण्या बाबत चा नागरिकांचा विनंती अर्ज आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कडे सादर केला, अध्यक्षानी हा विनंती अर्ज स्वीकृत केला असून आज आ मुनगंटीवार यांनी सदर विनंती अर्ज विधानसभा गृहात सादर केला. सदर विनंती अर्ज विधानसभा विनंती अर्ज समिती कडे पुढील कार्यवाही साठी पाठविण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

गेल्या पंधरा वर्षात विधानसभा विनंती अर्ज या संसदीय आयुधाचा वापर जिल्ह्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीने केलेला नाही. आ सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आशेचा किरण गवसला आहे.

या पुढील काळात विधानसभा विनंती अर्ज समिती सचिवांची साक्ष, निवेदक नागरिकांची मते जाणून घेत समस्येचे गांभीर्य जाणून घेईल . त्यानंतर समितीचे प्रमुख व सर्व सदस्य जिल्ह्याचा दौरा करून प्रदूषणाचा पाहणी दौरा करेल. त्यानंतर विधानसभा विनंती अर्ज समिती विधानसभागृहाला शिफारशिंसह आपला अहवाल सादर करेल. त्या माध्यमातून या समस्ये संदर्भात राज्य शासन उपाययोजना करेल.

या मार्गाने जिल्ह्यातील जल व वायू प्रदूषणाच्या समस्येबाबत उपाय योजनेची दिशा निश्चित होणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील प्रदूषणग्रस्त नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here