सावली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – २१ मार्च २०२५: तालुक्यातील मौजा चकपिरंजी येथील स्व.पार्वतीबाई शंकर महाडोळे ह्यांचे काल दिंनाक २० मार्च ला सायंकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी तातडीने चकपिरंजी येथे महाडोळे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी परिवाराला धीर देत म्हणाले, “या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या दुःखात सामील आहोत. .” अशा आश्वासक शब्दांत त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले.
या भेटीदरम्यान भाजपा तालुकाध्यक्ष अर्जुन भोयर, भाजपा गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, सद्गुरुनाथ चौधरी, माया चोधरी, आदी उपस्थित होते.

