प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आविष्कार सोशल फाउंडेशन कोल्हापूर, यांच्या वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कारचे नियोजन दि 23 रोजी सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते.
सौ राजश्री संजय जाधव (कवयित्री, साहित्यिका, सामाजिक कार्यकर्त्या) या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक साहित्यिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. अनेक गरजु लोकांना नेहमी मदत करत असतात. अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आर्थिक मदत करत असतात. अनेक अनाथ आश्रमांना भेट देऊन अन्नधान्याची व्यवस्था करत असत. तसेच अनेक विषयांवर कविता अनेक वर्षांपासून लिहीत आहेत.
300 हुन अधिक कविता, चारोळ्या त्यांनी लिहिलेले आहेत. तसेच अनेक कवी संमेलन, साहित्य संमेलन यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांना अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन अविष्कार सोशल फाउंडेशन यांच्या वतीने राजश्री जाधव यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अनिल देशमाने, प्रमुख पाहुणे दिपक आरवे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार अशा अनेक थोर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

