प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दिनांक 24/03/2025 ला ग्रामपंचायत जुनोना येथे 100 दिवसीय कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण टप्पा -2 अंतर्गत भुमीपुजन कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे भुमीपुजन अधिकारी मा. श्री. विवेक जाॅन्सन सर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. चंद्रपूर, यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मा. संगिता भांगरे मॅडम गटविकास अधिकारी प.स. चंद्रपूर , मा. विवेक शेंडे सरपंच , मा. किशोर कोडापे उपसरपंच , मा. ग्रेसी रंगारी मॅडम विस्तार अधिकारी, मा. नागेश पाल, मा. तेलंग , काकडे अभियंता प.स. चंद्रपूर, ग्रामसेवक अविनाश चौधरी, मा.नथ्थु औरासे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,शिक्षक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावस्तरीय शासकीय अधिकारी व कर्मचारी , महिला महासंघाचे सदस्य , ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत भुमीपुजन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विवेक जाॅन्सन सर CEO जि.प चंद्रपूर यांनी भुषविले तसेच गावकऱ्यांना मागदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. संगिता भांगरे मॅडम गटविकास अधिकारी यांनी केले. मा. विवेक शेंडे सरपंच यांनी मनोगत व्यक्त केले . पाहुण्यांचे स्वागत जि.प. उच्च प्राथमिक शाळा मधील मुलींनी डान्स द्वारे करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन मा. ज्योती लाहामगे मॅडम मुख्याध्यापक जि.प. उच्च प्राथमिक शाळा जुनोना यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मा. अविनाश चौधरी ग्रामसेवक यांनी केले.

