कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : ग्राहक समितीतर्फे सौ. रोहिणी अमोल पराडकर यांची प्रदेश सरचिटणीस (महिला आघाडी) म्हणून निवड करण्यात आली आहे. आजरा अर्बन बँकेच्या प्रांगणात शुक्रवारी (दि. २८ मार्च २०२५) झालेल्या विशेष बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर संयोजक मंडळाने त्यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक सेवेचा गौरव केला.
या सोहळ्यात तानाजीराव गुंड (प्रदेश अध्यक्ष) यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुकुमार पाटील (प्रदेश संघटन), मुस्ताक मेस्त्री (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष), मनोहर लोहार (प्रदेश उपाध्यक्ष), अपर्णा पाटील (शहर अध्यक्ष महिला), दगडू खोत (जिल्हा अध्यक्ष), रमेश रेवणकर (शहर अध्यक्ष), रोशन भालेकर (युवक जिल्हा अध्यक्ष), मेघा क्षीरसागर (प्रदेश उपाध्यक्ष महिला), वंदना घाटे (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महिला) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रोहिणी पराडकर यांच्या निवडीची दखल महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांनी घेतली असून त्यांनी वार्ताहर व संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा!

