प्रणय बसेशंकर
विशेष तालुका प्रतिनिधि
प्रबोधिनी न्यूज़, चंद्रपूर
नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय चर्मकार महासंघ कार्यकारणी बरखास्ततीमुळे वादळ निर्माण झाले होते. त्यामुळे व्यतित होऊन मान. विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांनी राजीनामा दिला होता. तो राजीनामा प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी मैत्रीचा धागा धरत व विदर्भ, मराठवाडा व तेलंगणा येथील समाज बांधवांची भावनेचा आधार घेत वणी येथे यशस्वी मध्यस्थीने सोडवला व पुन्हा अशी समस्या निर्माण होणार नाही याबाबत आश्वस्त केले. यामुळे विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील समाज बांधवांमध्ये संघटनेबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. ती सोडवण्यासाठी विदर्भ अध्यक्षांनी दिनांक 29 मार्च 2025 रोज शनिवारला जिल्ह्यात सदिच्छा भेटीचा दौरा आकला व त्या अनुषंगाने त्यांनी वणी तसेच चंद्रपूर येथील समाजातील पदाधिकाऱ्यांची व समाज बांधवांची सदिच्छा भेट घेतली होती. तेंव्हा छोटेखानी बैठकीला राज्य उपाध्यक्ष,राष्ट्रीय चर्मकार महासंघ
सौ.समिक्षा भटवलकर, जिल्हा अध्यक्ष विप्लव लांडगे, समन्वयक सुभाष भटवलकर, वरोरा तालुका अध्यक्ष मा.शंकरराव वरटकर, वणी शहर अध्यक्ष मा.प्रकाश राजूरकर, चंद्रपूर युवा अध्यक्ष मा.कुंदन धुळे, संत रविदास बहुउद्देशीय मंडळ घुटकाळा उपाध्यक्ष मा. दिवाकर पेलणे, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष मा.आकाश डुबे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. त्यावेळी समाजातील समस्या व इतर बाबींवर साधक बाधक चर्चा करण्यात आली होती.
या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघ ता. वाणी तसेच चंद्रपूर जिल्हा येथील पदाधिकारी अध्यक्ष पंढरी गुजरकर, युवा अध्यक्ष मोतीराम वादेकर, संत रविदास महिला समिती विसापूर अध्यक्ष सौ. संध्या वादेकर, व समाज बांधव शामराव लिपटे,नथूची दाहेदार, शिवकुमार बांगडे, पिंटू वाढई , सौ.वैशाली वाढई, प्रमोद लिपटे, सौ. मंगला लिपटे, मारोती दुबे, उद्धव खंडाळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप काकडे, नरेश लिपटे, सौ.गीता गुजरकर, कु.पल्लवी गुजरकर, श्रीमती. मीनाक्षी सूर्यवंशी, व इतर समाज बांधव बहुसंख्यने उपस्थित होते.

