शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा येथील नृसिंह सरस्वती स्वामी गुरु मंदिराच्या विकास कामाकरीता १७० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नास यश आल्याबद्दल कारंजा तालुक्यातील व शहरातील विविध सामाजिक संघटनेने तर्फे आ.सईताई प्रकाश दादा डहाके व अमोल भाऊ पाटणकर,मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी यांचा कारंजा विश्रामगृह येथे जाहीर सत्कार करण्यात आला.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील गुरु मंदिर तीर्थक्षेत्रासाठी १७० कोटी रुपये तर संत सेवालाल महाराज संस्थान पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रकल्प १ व प्रकल्प २ साठी ७२३ कोटी रुपयांची मान्यता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती देण्यात आली. घेण्यात आलेल्या सत्कारामध्ये खाटीक समाजाच्या वतीने सुनील मसने,नाथ समाजाच्या वतीने वैधर्भीय नाथ समाजाचे अध्यक्ष एकनाथजी पवार, तेली समाजाच्या वतीने सौ. जोस्त्ना झंझाट,अतुलभाउ गुल्हाने,किरण क्षार,सुनील दहापुते,विनय गुल्हाने,अतुल ढोरे,गजानन झझाट,वैभव जीरापुरे,गजानन गुल्हाने,लक्ष्मण सिंहे,राजेश बारडे,नितीन गडवाले,रवी गुल्हाने सुधीर आमले,माधव क्षार,जयंत क्षार,दिपक गोदे, नवघरे, ओम गुल्हाणे, गवळी समाजाच्या वतीने चांदभाई मुन्नीवाले, जटटवाले, कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने गाडगे, उदयकर, पोलीस कर्मचारी संघटनेच्या वतीने मनोज गोपने,चेतन गावंडे, अजय धनकर,भाकडे, लिंगायत समाज संघटना च्या वतीने राजेश हवा, मेहकर वकील संघटनेच्या वतीने ॲड.निखिल मिटकरी, ॲड. दिलीप वानखेडे, ॲड.अनिल अडेलकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने सुनील फुलारी,विलास राऊत, मोहम्मद मुन्नीवाले,एकनाथ पवार,महसूल कर्मचारी च्या वतीने सलीम खान,पांडे,परीट समाजाच्या वतीने संजय शहाकार,रुपेश शाहाकार,कलाल समाजाच्या वतीने रमेश कृमवंशी, अशोक गुप्ता,नरेंद्र गाढवे,निखिल घुडे अशाप्रकारे विविध संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

