“विदर्भ लोककलावंत संघटनेच्या संजय कडोळे कडून श्री. कामाक्षा देवी मंदिरात तर विश्वस्त निलेशजी घुडे कडून श्री. गुरूमंदिर येथे अभिनेते दिपक नांदगावकर, विशाल तराळ, नितेश ललित यांचा शाल श्रीफळ देवून सन्मान.”
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा (लाड) : अविष्कार सामाजिक क्रिडा शिक्षण बहुउद्देशिय संस्था कारंजा द्वारा अश्विन जगताप आयोजीत स्व. श्री प्रकाश डहाके स्मृती प्रित्यर्थ आयोजीत अविष्कार कारंजा नाट्य महोत्सव 2025 करीता कारंजा नगरीत आलेल्या, दिग्गज नाट्य कलावंत सिने अभिनेते,संत गजानन शेगावीचे या सन मराठी वाहिनीवरील मालिकेत संत पितांबर महाराजांची भूमिका वठविणारे अभिनेते दिपक नांदगावकर, झाडीपट्टी रंगभूमि सह सिने अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले विशाल तराळ, तसेच स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे अभिनेते नितेशजी ललित यांचे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने कारंजा नगरीत सहर्ष स्वागत करण्यात आले. अश्विन जगताप द्वारा आयोजीत कलावंत पत्रकार सन्मान सोहळ्या नंतर विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी पाहुण्यांचे मार्गदर्शक होवून त्यांना स्थानिक ममतानगर येथील श्री. संत गजानन महाराज संस्थान, श्री. नृसिह सरस्वती स्वामी जन्मस्थळ व श्री. गुरुमंदिर, श्री. कामाक्षा देवी संस्थान, श्री.गजानन महाराज मंदिर पोलीस स्टेशन आदी स्थळाचे दर्शन घडवून ऐतिहासिक कारंजा नगरीची माहिती दिली.
यावेळी ममतानगर येथील श्री. गजानन महाराज मंदिर तर्फे संजय सांगळे व सहकाऱ्यांनी, श्री. गुरुमंदिर तर्फे विश्वस्त निलेश घुडे यांनी, श्री. कामाक्षा देवी संस्थान येथे विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वतीने अध्यक्ष संजय कडोळे, उमेश अनासाने, प्रदिप वानखडे, दिगंबरपंत महाजन यांनी तर संत गजानन महाराज मंदिर शहर पोलिस स्टेशन कारंजा येथे सुरेशराव ठाकरे गुरुजी यांनी दिग्गज अभिनेते दिपक नांदगावकर, विशाल तराळ आणि स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे अभिनेते नितेश ललित यांचा शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.तसेच कारंजा येथील जैन बांधवाच्या श्री. पद्मावती काष्टासंघ जैन मंदिराचे सुद्धा त्यांनी दर्शन घेतले.यावेळी सर्व अभिनेत्यांनी,छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक वैभव संपन्न कारंजा नगरीची कुतूहलाने माहिती जाणून घेतली. स्वराज्य रक्षक संभाजीचे अभिनेते नितेश ललित यांनी, “आजचा दिवस आमचेसाठी संस्मरणिय असल्याचे मनोगत व्यक्त करीत कारंजा येथील संजय कडोळे, आश्विन जगताप यांचे आभार मानले.”

