
सिनेट सदस्या तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या पाठपुराव्याला आले यश…
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – प्रत्येकांचा प्रवास अधिक सोयीचा व्हावा व सुरक्षित व्हावा आणि सुसज्ज व्हावा जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या यासाठी आदरणीय आमदार धर्मराव बाबा आत्राम हे सतत प्रयत्नशील असतात. अहेरी विधानसभा क्षेत्रात एकूण पाच तालुके असून दळणवळणाचा मुख्य साधनांपैकी एसटी ही सर्वसामान्य गरीब लोकांसाठी जीवनदायीनी आहे.परंतु अनेक वर्षापासून पुरेशा बस नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यासाठी आदरणीय धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी एक जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना जिल्ह्यातील दोन्ही आगारात बसेस मिळावी ही मागणी लावून धरली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लवकरात लवकर अहेरी व गडचिरोली आगाराला नवीन बसेस देण्याचे मान्य केले होते. त्याची फलश्रुती म्हणजे आज अहेरी आगाराला 30 नव्या कोऱ्या बसेस मिळाले आहेत त्यापैकी 25 या मानव विकास मिशनच्या व पाच या लाल परी बसेस मिळाले आहेत.पुन्हा पाच लालपरी बसेस मिळणार आहेत. त्यामुळे अहेरी आगारातील बसेसची कमतरता आता दूर होणार आहे व नागरीकांचा प्रवास सुकर होणार आहे.
आज दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास अहेरी आगारात सदर तीस बसेसचे लोकार्पण सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम, व हर्षवर्धनराव बाबा आत्राम माजी पंचायत समिती सदस्य अहेरी यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला अहेरी आगाराचे डी.एम. घागरमुंडे, नागेश मडावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, लक्ष्मण येरावार विधानसभा प्रमुख, रतन दुर्गे सेवानिवृत्त प्राचार्य, वाडीभस्मे विभाग नियंत्रण गडचिरोली, चंदनकर साहेब, दोडके साहेब, लोखंडे व आगारातील चालक वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तिवारी, राजवैद्य, मोरे, चिपावार व करणे ढवळे सहारे भीमा झरे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. हस्तक, कुंबरे, पाटील, बडे यांनी सजावट केलेली होती.














