prabodhini news logo
Home चंद्रपूर इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर व इंडियन डेंटल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने डेंटल चेकअप...

इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर व इंडियन डेंटल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने डेंटल चेकअप कॅम्पचे आयोजन

0
212

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिटी कन्या शाळा, मराठी सिटी शाळा व हिंदी सिटी शाळा येथे डेंटल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांची दातांची तपासणी करून गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देण्यात आले तसेच पुढील उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले.

या उपक्रमामध्ये प्रख्याध्यापिका प्रतिमा नायडू यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रतिमा नायडू यांनी केली. इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश टोंगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत डॉ. पियुष लोढे, डॉ. अथर्व ससणकर, डॉ. भार्गव बांदे, डॉ. रक्षा जयस्वाल आणि डॉ. रेणुका कुटेमाटे हे सदस्य देखील उपस्थित होते.

इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्ष सुचिता जेऊरकर, सचिव पल्लवी तेलंग व पीपी ममता दादूरवाडे यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. अध्यक्ष सुचिता जेऊरकर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि दंत आरोग्य यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here