तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चिपळूण तालुक्यातील सर्व जलसा मंडळांनी एकत्र येत रत्नागिरी जिल्हा आंबेडकरी जलसा कला मंचाची स्थापना केली. या उपक्रमामध्ये तालुक्यातील एकूण १६ जलसा मंडळे सहभागी झाली होती. कार्यक्रमादरम्यान मंचाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे..
कार्याध्यक्ष सुभाष संभाजी जाधव (धामणवणे), अध्यक्ष प्रा. प्रदीप दत्ताराम मोहिते (ओमळी), सचिव सतीश काशिनाथ जाधव (कोकरे), खजिनदार सुशांत बबन जाधव (चिपळूण), उपाध्यक्ष मंगेश कदम (गुढे), धर्मपाल पवार (मांडकी), सहसचिव राजेश सावंत (कळंबस्ते), संजय स. पवार (खांडोत्री), सल्लागार मोहन कदम (शिरवली), संजय कदम (खेरशेत), सदस्य श्रीधर कदम (दुगवे), जयसिंग सावंत (कळंबस्ते), राजेंद्र मोहिते (तुरूबंव), विलास सकपाळ (वहाळ), अशोक पवार (असूर्डे), संतोष कदम (नायशी), राकेश मोहिते (मोरवणे), संजय पवार (मांडकी), प्रमोद सावंत (धामणवणे) यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्व जलसाकार मंडळांनी नव्या कार्यकारिणीचे मन:पूर्वक अभिनंदन केले. या मंचाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीला नवे बळ मिळेल व जलसा परंपरेचा सन्मान राखला जाईल, असा विश्वास सर्व सदस्यांनी व्यक्त केला.

