prabodhini news logo
Home चंद्रपूर इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे महिला कारागृहातील ब्युटीशियन प्रशिक्षणाचा समारोप सोहळा संपन्न

इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे महिला कारागृहातील ब्युटीशियन प्रशिक्षणाचा समारोप सोहळा संपन्न

0
131

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्यूज़ -इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरतर्फे चंद्रपूर महिला कारागृहात सुरू असलेल्या ब्युटीशियन प्रशिक्षणाचा समारोप समारंभ आज दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कारागृहातील महिलांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रमाणपत्रांच्या आधारे त्यांना कारागृहातून मुक्त झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन मिळवता येणार आहे.

या कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्षा सुचिता जेऊरकर, ममता दादूरवाडे, कीर्ती केशात्तीवर तसेच प्रशिक्षण देणाऱ्या अवणी कासनगोटूवा आणि वैशाली यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कारागृह अधीक्षक कुमरे सरांनी भूषविले. कार्यक्रमाचे संचालन कारागृहाचे गुरुजी हतवाडे सर यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.

या उपक्रमामार्फत महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची संधी मिळाली असून, समाजात पुन्हा नव्याने उभं राहण्याचा आत्मविश्वास मिळणार आहे, असे वक्तव्य यावेळी करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरने घेतलेली ही सकारात्मक पावले निश्चितच समाजात बदल घडवणारी ठरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here