ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मुख्यमंत्री १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शनाने गटविकास अधिकारी, पंडीत राठोड यांच्या संकल्पनेतुन अंबरनाथ पंचायत समिती अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीरास उत्सुर्फूत प्रतिसाद मिळाला.
सेन्ट्रल हॉस्पीटल उल्हासनगरचे सिव्हील सर्जन डॉ.बनसोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.विलास वाघमारे, डॉ.हरीश बागडे, कमल शिंदे व त्याच्या टिमने अतिशय मेहनतीने हा कॅम्प यशस्वी केला.
अंबरनाथ पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहीते आणि त्यांच्या टिमने आरोग्य तपासणीचे काम अतिशय यशस्वीपणे पार पाडले. सुमारे 250 अधिकारी व कर्मवारी यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. यामध्ये शुगर, बी.पी., H.B. इत्यादींची चिकित्सा करण्यात आली.
या शिबीरात एकुण 49 अधिकारी व कर्मचारी रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. यामध्ये तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.
रक्तदान कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी डॉ.विशाल पोतेकर, उपअभियंता बांधकाम पोतदार, एकात्मिक बालविकास अधिकारी योगेश यंदे, विस्तार अधिकारी सांख्यिकी प्रदीप मोहेकर, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत आर.बी.महाले, पशुधन विकास अधिकारी डॉ.शितल कारगिरवार यांनी विषेश प्रयत्न केले आहेत.

