क्रांतीसुर्य ज्योतिबा
कार्यानी झाले महान
घ्यावे शिक्षण स्रियांनी
दिला आहे मंत्र छान।।
शिक्षणाची सुरूवात म्हणून
पत्नी सावित्रीला शिकविले
अक्षर अक्षर गिरवून तिला
पहिली स्त्री स्त्री शिक्षिका केले।।
स्रियांसाठी पहिली शाळा
पुण्यात त्यांनी काढली
शिक्षण आणि हक्काचे
तंत्रही त्यांनी जाणली।।
विधवा विवाहाला
प्रोत्साहन त्यांनी दिले
दलितांसाठी पाण्याचा
हौद त्यांनी खुले केले।।
सतीप्रथा बालविवाह
रूढी त्यांनी केले नष्ट
समाज कार्यासाठी त्यांनी
सोशिले अनेक कष्ट।।
बहुजन समाजाचे ते
उद्धारकर्ते ही झाले
शेतकऱ्याच्या हितासाठी
शेतकरी आसूड ग्रंथ लिहिले।।
ज्ञानाचे महत्त्व हे
ज्योतिबानी जाणले
शिक्षण देऊन सर्वांना
माणसात त्यांना आणले
ज्ञानाच्या क्रांतीसूर्याला
चला करू त्रिवार वंदन
शिक्षण देऊन मानवाचे
जीवन केले नंदनवन।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

