प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – महात्मा

0
47

ना ढाल ना तलवार
केला अज्ञानाचा संहार
लेखणी हे शस्त्र घेऊन
अज्ञानास लाविले पळवून

साक्षर स्त्रीत्व केले
ज्ञानाचे कवाड उघडले
स्त्रियांचे अस्तित्व जागवुनी
दिला नरनारी समान अधिकार

रायगडावर शिवसमाधी शोधूनी
पाया रचिला शिवजयंतीचा तुम्ही
प्रथम पोवाळा शिवरायांचा रचूनी
गायीले शिवशक्तीचे गुणगान

बालविवाह रोखिले,
रोखिली सतीची चाल
विधवा पुनर्विवाह सुरू केले
सुरू केले पाळणाघर

“गुलामगिरी”;”शेतकऱ्यांचा आसूड”, “ब्राह्मणांचे कसब”,” सत्सार”,”इशारा”, “सार्वजनिक सत्यधर्म” पुस्तकांनी केला ज्ञानाचा अविष्कार

भारतीय स्त्री शिक्षणाचे प्रणेते
धर्मपत्नी सावित्रीबाई शिक्षितकेले
प्रथम समाज सुधारक ठरले
गाते गुणगान तुमचे गाते गुणगान

सौ. माधुरी धनोकार
अकोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here