
महात्म्य ज्योतिबा फुले,
समतेचे होते आदर्श,
स्त्री शिक्षणाच्या बाबतीत,
जाणवला त्यांचा प्रकर्ष…१
क्रांतीसूर्य महात्मा फुले
लोकप्रिय व्यक्तिमत्व
लोकहितकारक होते
त्यांचे ज्ञान आणि तत्व…..२
सर्व जातिंयांना समान हक्क
मिळवण्यासाठी दिला लडा
दलित आणि इतर जातींना
पुढे येण्याचा दिला धडा..३
जातीविरोधी चळवळीत
सक्रिय पुढाकार घेतला
महिलांच्या शिक्षणाचा
योग्यप्रकारे प्रसार केला…..४
महाराष्ट्रातील एकमेव
कार्यकर्ते होते सामाजिक
दुर्दम्य प्रथा बदलासाठी
प्रयत्न केला प्रामाणिक….५
धन्य ते ज्योतिबा फुले
दिनदुबळ्यांचा कळवळा
स्पृश्यता- अस्पृश्यतेचा
कायमचा हटवला अडथळा..६
नवनाथ रामकृष्ण मुळवी
गोवा














