
आई भीमाबाईच्या उदरी
भीमा तुझा जन्म झाला.
भारतात रचुन संंविधान
हा क्रांतीसुर्य उदयास आला.
शिक्षणाचा करून प्रसार
अन्यायाविरुद्ध लढा दिला
भेदभावाची कापून दोरी
ज्ञानाचा प्रकाश दिला.
शिक्षणाचे पाजून बाळकडू
संस्काराचे धडे दिले
कायद्याचा अभ्यास करून
राज्यघटनेचे शिल्पकार झाले.
संविधानाची जपून शिदोरी
ठेवू बाबासाहेबांचा मान
खूप अनमोल ठेवा आहे
बाबासाहेब सोनेरी पान
भीमा तुझ्या जन्मामुळे
अज्ञानाचा अंधार नाहिसा झाला
धन्य आहे ती माऊली
जिने तूला जन्म दिला.
सौ. भारती वसंत वाघमारे
राहणार मंचर ता. आंबेगाव जि. पुणे














