Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – “शब्द फुले “

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – “शब्द फुले “

0
187

देव वाणीत शब्द फुले
हृदय भक्तीत झुरे
मानवास मार्ग दाखवीत
गीता सार पुरे…..१

एक एक श्लोक प्रश्नांची उत्तरे
कृष्णाची लीला वेळ स्तब्ध थांबलेला
जणू शब्दांनी मोहले
परिसरात वाऱ्यांनी लावले अत्तरे…..२

सुगंधी शब्द फुले कृष्णाच्या मुखात
धर्म युद्ध ही झाला
भीष्मानेही भोगले कर्म दुःखात
कसे राहशील मानवा तू सुखात….. ३

शब्द उच्चारावे भले कोणासाठी
उत्तरेही येतात पलटूनी पाठी
करावे भले कार्य जगासाठी
कृष्णच आहे आपला जीवनसाथी….. ४

सौ. वर्षा साठे शिंत्रे
पणजी, गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here