भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन

0
79

नितीन पाटील तालुका प्रतिनिधी अमळनेर – अमळनेर तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर चौकातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर मोठा जनसागर लोटला होता. तसेच सायंकाळी ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात मिरवणुका पार पडल्या.
शहरात विविध प्रकारच्या सृजनात्मक व वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7 वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सामूहिक बुद्ध वंदना झाली. यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाबसाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा आ अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, डीवायएसपी विनायक कोते, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी केदार बारबोले, माजी नगरसेवक नरेंद संदानशिव यासह राजकीय, सामाजिक व शासकीय क्षेत्रातील मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर धम्म रॅली सकाळी 9 वाजता पार पडली.
तर डॉ. आंबेडकर चौकात जयंती उत्सव सायंकाळी पार पडला.  यावेळी मोठी गर्दी याठिकाणी झाली होती. यावेळी अनेकांनी ठेका धरत जल्लोष केला. अमळनेर जयंती उत्सव समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, सिद्धार्थ व्यायाम शाळा तसेच अध्यक्ष नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांनी सदरचे आयोजन केले होते.
तसेच शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील बंगाली फाईल परिसर,फरशी रोडवर ए बी ग्रुपतर्फे, व्ही. एस. ग्रुप, स्टेशन रोडवर प्रबुद्ध कॉलनी तसेच विविध ठिकाणी देखील जयंती उत्सव साजरा होऊन जल्लोषात मिरवणूका काढण्यात आल्या. ग्रामिण भागात देखील पूजन व विविध कार्यक्रम पार पडलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here