सावंगी येथे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम; आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते उद्घाटन

0
40

देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सावंगी (ता. देसाईगंज) – सावंगी गावात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमात आमदार मसराम यांनी दोन्ही महापुरुषांच्या विचारांवर प्रकाश टाकत समाज परिवर्तनासाठी त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “शिकून सुसंस्कृत व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश आजही समाजासाठी दिशादर्शक आहे,” असे ते म्हणाले.

या वेळी उपस्थीत माजी आमदार कृष्णा गजबे,अमित केरामी, युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज अमर भर्रे, रामकृष्ण शहारे,घनश्याम ढोरे, माधव बुल्ले,शामराव अलोने, भिवाजी पेलणे, मोतीराम उईके, पुंडलिक साखरकर उपस्थित मान्यवर व गावकरी मंडळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here