प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय येथे “भारतीय संविधानाचे जनक” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त “डॉ. भिमराव आंबेडकर का दष्टिकोण बनाम आज कि वास्तविकता” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. दलित आदर्श व्यक्तीच्या सन्मानार्थ आंबेडकर जयंती २०२५, १५ एप्रिल रोजी साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपले सर्व कार्य आणि जीवन कामगार, महिला आणि अस्पृश्यांच्या उत्थानासाठी समर्पित केले तसेच ज्यांना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे जनक मानले जाते यांच्या जयंती निमित्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. विधी महाविद्यालयाचे प्राध्यपिका डॉ. मार्गवी डोंगरे यांनी या प्रसंगी आयोजित त्यांच्या उदभोदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. अस्पृश्या निर्मूलन असो किंवा समाजातील दुर्बल घटकांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास असो बाबासाहेब यांच कार्य अवर्णनीय असे आहे असं मनोगत डॉ. मार्गवी डोंगरे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थितांना संबोधित करतांना आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही हा भारताचा महत्वपूर्ण आधारस्तंभ अधोरेखित होत असल्यामुळे प्रत्येकानी ही लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्नशिल राहावे असे आव्हान प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी केले. डॉ. ऐजाज शेख यांनी सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विध्यार्थी यांनी लोकशाही सुदृढ होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वाचे पालन करून हिच आदरांजली अर्पण करण्यासाठी प्रोत्साहित केले.
महाविद्यालयचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता, पदवीत्तर विभाग प्रमुख डॉ. पंकज काकडे, संगणक विभाग प्रमुख प्रा. सुबोध मेश्राम, तिन वर्षीय अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्रा डॉ. अभय बुटले, प्रा. डॉ. मार्गवी डोंगरे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली. या प्रसंगी कार्यक्रमांची सुरूवात भारतीय संविधानाची प्रस्तावना याचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी केले.

