करंजा लांड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नीता लांडे यांना समाजसेवेची आवड आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन स्त्री शक्ती मंच संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षा शारदा अतुल भुयार यांनी त्यांची निवड स्त्री शक्ती मंच संघटनेच्या महिला संघटिका म्हणून केली आहे.
नीता लांडे यांनी वृक्षारोपण पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला असुन खेडे , शहरात शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षारोपण साठी मार्गदर्शन करतात, स्वतः रोपं तयार करुन वाटप करतात.शासनाचा सर्वोच्च असा छत्रपतीं शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
उतराखड प्रदुषण बोर्डाने वृक्षारोपण साठी अर्थ स्टार अवार्ड देऊन गौरविण्यात आले.
स्त्री शक्ती मंच संघटनेचा उद्देश महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केला जातो. कर्तुत्ववान महिलांच्या कार्याचा सन्मान करणे, शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचवणे, कौटुंबिक वादविवाद प्रेमाने निराकरण करणे, लेक वाचवा अभियान राबवणे, वृक्षारोपण साठी कार्यक्रम घेऊन, वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.खेडयापासुन तर शहरात महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी संघटन असुन महिला जास्तीत जास्त यात सहभागी होण्यासाठी नीता लांडे यांच्याशी संपर्क साधावा.

