आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नातून विकासकामास मंजुरी
आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – १५ एप्रिल – तालुका आरमोरी अंतर्गत येणाऱ्या सायगाव येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर झाले असून, या कामासाठी आमदार रामदास मसराम यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सातत्याने मागणी केली जात होती. विशेषतः पावसाळ्यात ही वाट अत्यंत खराब होत असल्याने अंत्यविधीच्या वेळी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांनी तातडीने लक्ष घालून निधी उपलब्ध करून दिला आहे.
या कामाच्या मंजुरीनंतर सायगाव परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, यामुळे ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी आता सुलभ व सुटसुटीत मार्ग मिळणार आहे.
या वेळी कार्यक्रमस्थळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, ग्रामपंचायत उपसरपंच मनोज पांचलवार, सदस्य खेमराज भाऊ प्रधान, जितेंद्र हरगुळे, दीपक हारगुळे (पोलीस पाटील), तसेच महेश बरडे, मन्साराम जी प्रधान, चरण जी प्रधान, प्रकाश जी प्रधान, प्रभू माकडे, राजेंद्र वाघाडे, अमोल प्रधान, उमेश माकडे, टीकाराम प्रधान, सुखदेव प्रधान, हरिचंद्र कांबळे, राजू दुमाने, नवनाथ धोटे आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

