पाखरांची शाळा
भरते रोज तारावर
घंटी वाजताच पाखरं
सर्व होतात हजर
प्रार्थना गातात
पाखरं एकसुरात
अशीच होते रोज
शाळेची सुरूवात
पहिलीचा वर्ग ते
वर्ग आठवीचा
घेतात आनंद
पाखरं शिकण्याचा
वाटतच नाही त्यांना
शाळा कंटाळवाणी
बाहेर पडतात पाखरं
होऊन समाधानी
एका पाठोपाठ एक
राहतात सुरू तासिका
कवींचा परिचय त्यातुन
होतात परिचित लेखिका
खेळ,क्रिडा,नृत्य
मिळतो आनंद यातुनही
शिस्तीतली पाखरं त्यांना
कधी शिक्षाच होत नाही
नित्यनियमाने पाखरं
शाळेत रोज येतात
मोठ्या आत्मविश्वासाने पाखरं
गगणी भरारी घेतात
अनिता कांबळे
यवतमाळ

