prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – सन्मान नात्यांचा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – सन्मान नात्यांचा

0
115

आपुलकी हृदयाची,
आणि मनातली भावना,
पुस्तकाच्या नात्यातली,
असते खरी प्रस्तावना…१

काही प्रेमळ शब्दांनी,
हळवेसे व्यक्त व्हावे.
घ्यावी हलकी खबर,
स्नेह सदा दर्शवावे…२

कोणत्याही कारणाने,
जुळलेले नाते सुंदर.
जीवनभर टिकवावे,
ऋणानुबंध निरंतर…३

मानवता हाच खरा धर्म,
राखा आपुलकीचा झरा.
सन्मान नात्यांचा करावा
एकमेकांना ध्यावा आसरा…४

स्वरचित
नवनाथ रामकृष्ण मुळवी
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here