prabodhini news logo
Home ठळक बातम्या कमी उंचीमुळेच बांधली त्यांच्या आयुष्याची दोर

कमी उंचीमुळेच बांधली त्यांच्या आयुष्याची दोर

0
283

सौदानेच्या कुणालच्या विवाहाची चर्चा

सुरेखा गांगुर्डे देवळा तालुका प्रतिनिधी

सौंदणे येथील अवघी तीन फूट उंची असलेल्या कुणाल व नायगाव येथील अश्विनी यांचा विवाह नुकताच नायगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथे थाटामाटात झाला, विशेष म्हणजे या नववधूची उंचीही केवळ तीन फूट असून त्यामुळेच त्यांच्या आयुष्याची दोर मजबूत बांधली गेली आहे, या जोडप्याच्या विवाहाची सर्वत्र तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे,
कुणालची आई सुरेखा या एक ग्रामविकास अधिकारी आहेत, व वडील हे एका संस्थेत चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत, कुणाल हे त्यांचे पहिले अपत्य , ज्यावेळी कुणालची उंची कमी असल्याच समजले त्यावेळी सर्व चिंचोले कुटुंब खचून गेले ,
कुणालचे असलेले गायन, तबलावादन व गीतलेखन हे छंद अंगी जोपासात तेवढ्याच उत्साहाने बी एससी, ते बी एड पर्यंत शिक्षण पूर्ण केले ,2023 मधे कुणालला टेलिफोन ऑपरेटर व त्यानंतर माध्यमिक शाळेत कनिष्ठ लिपीक म्हणून संधी मिळाली , नोकरी मिळाल्यावर कुटुंबीयांनी मुलगा बघायला सूरवात केली तेंव्हा नायगाव येथील मोहन लांडे यांची कन्या अश्विनी इची ही उंची 3 फूटच, ती एम कॉम होऊन पुण्यातील एका खाजगी बँकेत नोकरी करीत आहे, कुणालच्या नातेवाईकांनी स्थळाबाबत सांगितल्यावर मग काय दोघी कुटुंबीयांनी भेटून हे पवित्र बंधन म्हणजे त्यांचा विवाह सोहळाची तारीख ठरवली, व अश्या प्रकारे 19 एप्रिलला त्यांचा विवाह संपन्न झाला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here