भंडारा येथे १० रक्तदात्यांनी केले रक्तदान
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
(भंडारा)- उन्हाळ्याच्या दिवसात जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागात रक्तगटाचा तुटवडा भासत असतो. तो अनुशेष भरून काढण्यासाठी श्री सत्यसाई सेवा संघटना भंडाराच्या वतीने भगवान श्री सत्यसाई बाबांच्या १०० व्या जन्मदिन शताब्दी वर्षा निमित्त भव्य रक्तदान शिबिर श्री गणेश हायस्कूल भंडारा येथे रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ ला घेण्यात आला.
श्री सत्यसाई सेवा संघटना जिल्हा भंडाराचे जिल्हाध्यक्ष धनराज माहुले, समिती प्रमुख रविंद्र नागपुरे, रविशंकर साकुरे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी येथील डॉ. श्रृतीका मडावी, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, ताराबाई ठोंबरे, पर्यावरण प्रेमी राहुल मेश्राम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
त्याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी येथील डॉ. श्रृतीका मडावी, टेक्निशियन आकाश महाजन, सना शेख, राहुल गिरी, अश्विन नेवारे, हनमंत गुट्टे इत्यादींनी आपली भूमिका पार पाडली. त्यावेळी अनुराग निंबार्ते, फिरोज मन्नान शेख, स्मित बनकर, किशोर हटवार, मोहित पाठेकर, धनराज माहुले, तुषार पाठेकर, नंदू हटवार, सुनिल मदारकर, महेश जोशी या रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता यशवंत टिचकुले, प्राची देशपांडे, ताराबाई ठोंबरे, प्रकाश चाचेरे, चिन्मय नागपुरे, श्रीराम रावते, श्यामराव ठोंबरे, विजय हटवार, प्रकाश लांजेवार, अनिल ठोंबरे, शिवांश नागपुरे, वैभव सुर्यवंशी व श्री सत्यसाई सेवा समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

