तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्यूज़ – चंद्रपूर – गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या एनआरसी (न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर) वॉर्डात उपचार घेत असलेल्या कुपोषित बालकांसाठी इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. डॉक्टर सीमा शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या वॉर्डात मुलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळणी, पिक्चर बुक्स आणि चटया देण्यात आल्या.
या उपक्रमामुळे उपचारासाठी आलेल्या प्रत्येक मुलाला एक आनंददायी आणि सकारात्मक वातावरण मिळेल. उपचारादरम्यानचा वेळ मुलांसाठी अधिक आनंददायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमासाठी क्लबच्या अध्यक्षा सौ. सुचिता जेऊरकर, अर्चना उचके, Past President विद्या रघुशे, IPP राखी बोराडे, तसेच क्लब सदस्या वैष्णवी निमकर यांची विशेष उपस्थिती होती.
हा उपक्रम हा क्लबचा समाजातील दुर्बल घटकांसाठी असलेला सामाजिक बांधिलकीचा एक भाग आहे, असे मत अध्यक्षा सुचिता जेऊरकर यांनी व्यक्त केले.

