आदिवासी जनतेला दिलासा
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – गर्देवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोईनवर्षी या अतिदुर्गम व आदिवासीबहुल गावातील ऊर्जेवर आधारित दुहेरी हातपंप मागील काही महिन्यांपासून बंद अवस्थेत होता. या सौरपंपाच्या बंद झाल्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वनवना भटकावे लागत होते.
या समस्येकडे लक्ष वेधत किसान सभेचे गाव शाखा अध्यक्ष सत्तू हेडो यांनी कॉ. सचिन मोतकुरवार, भाकपा अहेरी विधानसभा अध्यक्ष व किसान सभेचे पदाधिकारी यांना माहिती दिली.
भाकपा व किसान सभेच्या वतीने शासनाकडे तातडीने सौरपंप दुरुस्तीची मागणी व पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने त्वरित दखल घेत सौरपंपाची दुरुस्ती केली.
या दुरुस्तीनंतर गावातील नागरिकांना पुन्हा एकदा शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले असून, आदिवासी बांधवांनी भाकपा व किसान सभेचे आभार मानले आहेत.
ही कामगिरी ग्रामविकासासाठी सक्रिय असलेल्या भाकपा-किसान सभा च्या संघर्षाची व लोकशक्तीच्या एकजुटीची फलश्रुती ठरली आहे.

