श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरचा उपक्रम
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर: चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र ऊर्जानगर वसाहत येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळच्या वतीने निवासी स्वरूपाचे “ग्रामगीताप्रणित बाल संस्कार, व जीवन शिक्षण शिबिर” दिनांक. २५ एप्रिल २०२५ ते दि.०४ मे २०२५ पर्यंत आयोजित केलेले आहे.आज समाजातील तरुण वर्ग व विद्यार्थी हा आळस, व्यसन, बेरोजगार, कुसंगत, राग, लोभ यानी त्रस्त झालेला आहे. त्यामुळे त्याला शील, चरित्र, सुख समाधान मिळत नाही व शांतीपुर्ण जीवन कसे जगावे याचे ज्ञान मिळत नाही. शिक्षण घेऊनही तो मानसिक, शारीरिकदृष्ट्या परावलंबी जीवन जगत आहे म्हणुन सदर शिबिराच्या माध्यमातून ह्या सर्व विषयांचे ज्ञान तरुण पिढीपर्यंत पोहचवायचे आहे.
वंदनीय राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेतील वैज्ञानिक विचार समोर ठेवून आजच्या तरुण मुला-मुलींचे जीवन सुंदर बनावे, आजची युवापिढी सशक्त, निरोगी, निर्व्यसनी, स्वाभिमानी व चरित्रवान, देशभक्त बनून त्यांच्या अंगी स्वावलंबन, स्वयंशासन व स्वयंपूर्णतः इ. गुणांची वाढ व्हावी. शालेय अभ्यासक्रमातून लुप्त झालेले जीवन शिक्षण युवापिढीला मिळावे. मुलामुलींना बालवयातच सुसंस्काराची सवय लागून आदर्श दिनचर्येचे पालन व्हावे याकरिता बालसंस्कार व जीवन शिक्षण निवासी शिबिराचे आयोजन केलेले आहे. सदर शिबिरात अध्ययन, व्यायाम व उद्योग यावर विशेष भर दिल्या जाईल. आपला पाल्य निरोगी, स्वावलंबी, निर्व्यसनी, स्वाभिमानी व सुदृढ होण्याकरिता सदर शिबिरात प्रवेश घेऊन शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
शिबिरातील अभ्यासक्रम
अध्ययन : सामुदायिक ध्यान व प्रार्थना, ग्रामगीता पठण, आदर्श दिनचर्या, समुहगाण, स्वावलंबन, स्वयंशासन, व्यक्तिगत विकास, जीवन शिक्षण, जीवन शुद्ध करणारे विविध प्रकारचे तत्वज्ञान, दैनंदिन संस्कार, सेवा मंडळाचे कार्य, गायीचे महत्व व औषधी महत्व, वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज व कर्मयोगी तुकारामदादा जीवन चरित्र,
व्यायाम: योगा व प्राणायाम, सुर्यनमस्कार, मनोरे, लाठी-काठी, बनेटी, ढाल तलवार, कराटे, शारीरिक क्रीडा उपक्रम.उद्योगः जीवन उपयोगी औषधी व वस्तु तयार करणे.
शिबिराची दिनचर्या दिनांक २५ एप्रिल ते ०४ मे २०२५ पर्यंत
सकाळी ४ ते ५:३० प्राप्तस्मरण, प्रातः विधी
सकाळी ५:३० ते ६:३० सामुदायिक ध्यान व मार्गदर्शन
सकाळी ६:३० ते ८:०० योगासन, प्राणायाम व सूर्यनमस्कार
सकाळी ८:०० ते ९:०० नास्ता, अल्पोपहार
सकाळी ९:०० ते १२:०० मैदानी व्यायाम (लाठी-काठी, दांडपट्टा, ढाल-तलवार आणि कराटे)
दुपारी १२:०० ते १:०० सामुहिक भोजन
दुपारी १:०० ते ३:०० विश्रांती
दुपारी ३:०० ते ५:०० ग्रामगीता तत्वज्ञान व मार्गदर्शन
सायं. ५:०० ते ६:३० अध्ययन व उद्योग व व्यायाम
सायं.७:०० ते ८:०० सामुदायिक प्रार्थना व मार्गदर्शन
रात्री ८:०० ते ९:०० सामुहिक भोजन
रात्री ९:०० ते १०:०० चर्चा सत्र व शंका समाधान
रात्री १०:०० राष्ट्रवंदना व निद्रापुर्व प्रार्थना
मार्गदर्शक: आदरणीय सुबोधदादा संचालक व सुश्री रेखाताई, व्यवस्थापक आत्मनुसंधान भुवैकुंठ अड्याळ टेकडी, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर
प्रशिक्षक: अक्षय कुळे, विशाल वैद्य, चंद्रशेखर ढोरे, आरती दोनाडकर,ऋतुजा कोंडेकर, कीर्ती जोगी यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभणार आहे असे आयोजक श्री गुरूदेव सेवा मंडळ, ऊर्जानगर,चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे
संपर्क:-8806025836, 9834106517, 8007524422, 8806667455, 7448206488, 9421724363, 8329296993, 9765427353, 9764178665, 9421814601

