पोंभुर्णा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कसरगट्टा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पोंभुर्णा अंतर्गत कसरगट्टा अंगणवाडी केंद्र येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच गावातील महिला व किशोरवयीन मुलीं करिता जिल्हा महिला बालविकास अधिकारी मा. दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चाईल्ड हेल्पलाइन यांच्या विध्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्यामध्ये पोषण अभियान पंधरवाडा, ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व महिलांना जेंडर बजेट बाबत, आरोग्य, कुटुंब नियोजन प्रशिक्षण तसेच गुड टच बॅड टच, बालकांविषयी कायदे व योजना, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006, बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम 2012, बालकामगार तसेच सोशल मीडियाचे फायदे तोटे व मोबाईलचा अतीवापर याबाबत अतिशय सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आले. बालकांसाठी कार्य करणारी यंत्रणा चाइल्ड हेल्पलाइन 1098 बाबत अंकुश उराडे केस वर्कर यांनी मार्गदर्शन केले. तर जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार व महिला हेल्पलाइन १८१ याबाबत श्री. शामराव मोदीलवार संरक्षण अधिकारी माहिती देत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमाला उपस्थित ग्रा. पं. कसरगट्टा सरपंच अध्यक्ष पिपरे मॅडम, ग्रा. पं. सदस्य भावना धोडरे, अजय साखरकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी चंद्रपूर, शामराव मोदीलवार संरक्षण अधिकारी चंद्रपूर, लाडे पोंभुर्णा सीडीपिओ, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पोंभुर्णा, भावना दरेकर सर्कल सुपरवायझर तसेच अंकुश उराडे केस वर्कर जिल्हा चाइल्ड हेल्पलाइन चंद्रपूर आदी उपस्थित होते.

