सुरेखा गांगुर्डे
देवळा तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
8459702192
देवळा तालुक्यात उष्णतेचे प्रमाण वाढले असून,अंगाची लाहीलाही झालेल्या नागरिकांसाठी देवळा येथे बळवंत अहिरराव यांनी बसस्टॉप समोर पाणपोई उभारून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
सद्या सर्वत्र दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असून, त्यात दाट लग्न तिथी या धावपळीत नागरिक हैराण झाले आहेत . थंड पेय ला देखील मागणी वाढली आहे . देवळा येथे गेल्या अनेक वर्षांपासून बळवंत अहिरराव यांनी पाणपोई उभारली असून,उन्हाळ्यात या पाणपोई वर पाण्याची तहान भागविण्यासाठी थांबतात .अजून उन्हाळा एक दीड महिना लांबणीवर असल्याने नागरीक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी टोपी , उपरणे ,गॉगलचा वापर करताना दिसत आहेत . नुकतीच सप्तश्रृंगी गडावरची चैत्रोत्सवाची यात्रा पार पडली असून, या मार्गावरून गडावर जाण्यासाठी खान्देश भागातील भाविकांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते . याकाळात पाणपोईचा भाविक लाभ घेतात . संपूर्ण उन्हाळा भर अहिरराव हे पाणपोईच्या माठातील पाणी कमी होऊ देत नसून, त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे देवळा शहरात कौतूक केले जात आहे .
फोटो ओळ ; देवळा येथे बळवंत अहिरराव यांच्या पाणपोई वर पाणी पितांना वाहन धारक आदी

