“इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडारा, धावून आली पीडितेच्या मदतीला

0
72

शिवनाळा, किरमिटी येथील आगग्रस्तांना मदत साहित्य किटचे वाटप, पवनी येथील डॉक्टरांच्या चमू कडून पिडीतेचे सांत्वन.

सुखदेव काटकर तालुका प्रतिनिधी तुमसर – आज दिनांक २२/०४/२०२५ ला इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडाराच्या मानवीय मदतीतून, सेक्रेटरी डॉ. नितीन तुरसकर व चेअरमन डॉ. अशोक ब्राह्मणकर यांचे विशेष मार्गदर्शनातून पवणी तालुक्यातील शिवनाळा येथील घर जडीत, पीडित श्रावण इटाणकर, मारुती ईटाणकर, गोकुळ ईटाणकर इत्यादी चे परिवारांना पवणी येथील सक्रिय रेड क्रॉस आजीवन सदस्य डॉक्टर विजय ठक्कर यांचे नेतृत्वात डॉक्टर प्रभाकर लेपसे,डॉक्टर विकास बावनकुळे, डॉक्टर श्रीकांत चांदेवार, डॉक्टर संदीप खंगार, डॉक्टर विक्रम राखडे,यांचे हस्ते रेड क्रॉस मदत किटचे वाटप करण्यात आले तसेच किरमिटी, तालुका लाखांदूर येथील घरजडीत मंगेश किसनलाल कावळे यांना आजीवन सदस्य राजू खवसकर यांचे हस्ते मदत साहित्य किट देण्यात आली. अति संकटात धावून जाणारी रेड क्रॉस,शिवनाळा गावातील गरीब मजूर संजय इखार विद्युत शॉकनी आजारी यांचे घरी डॉक्टर टीमणी जाऊन सांत्वना भेट दिली.
मदत साहित्य किट वाटप प्रसंगी गावातील ज्येष्ठ समाजसेवी, प्रतिष्ठित शिवनाळा येथील सरपंच सुभाष खंदाडे, उपसरपंच द्रोनाचार्य बावनकर यांचेसह गणेश वैद्य, चंदन देशमुख, रमेश सावरबांधे, रमेश कोसेकर व किरमिटी येथील ग्रामपंचायत सदस्य चेतन कावळे, घर पीडित महिला कविता कावळे, चेतन मेश्राम इत्यादी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here