आमदार तथा जिल्हा निरीक्षक अभिजित वंजारी,खासदार डॉ.नामदेव किरसान व जिल्हा प्रभारी मुजीब पठाण यांची मुख्य उपस्थिती
सुविद्या बांबोडे विदर्भ संपादिका प्रबोधिनी न्युज – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार सावली शहर व तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज दिनांक २४ एप्रिल २०२५ ला स्व.वामनरावजी गड्डमवार किसान सांस्कृतिक सभागृह, सावली येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते,पदाधिकारी व कार्यकर्तागणं यांची आढावा बैठक संपन्न झाली,या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याचे निरीक्षक, विधान परिषदेचे मुख्य प्रतोद तथा आमदार मा. अभिजितदादा वंजारी, तथा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान ,जिल्हा प्रभारी मा. मुजीब पठाण यांनी मार्गदर्शन केले.
आढावा बैठकीचा मुख्य उद्देश निवडणूकी संबंधित उचित नियोजन व कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, पक्षवाढीसाठी विविध उपक्रम राबविणे, बूथ प्रतिनिधी,बूथ अध्यक्ष तसेच ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी यांचे प्रशिक्षण घेणे इत्यादी महत्वपूर्ण बाबींवर बारकाईने संघटनात्मक चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी माजी जि.प.सदस्य तथा जेष्ठ पदाधिकारी पांडुरंग पाटील तांगडे,तालुका अध्यक्ष नितीन गोहने, नगराध्यक्ष सौ.लता लाकडे, माजी सभापती प.स.सावली विजय कोरेवार, माजी सभापती प.स. तथा कृषी.उ.बा.स संचालक सावली राकेश पाटील गड्डमवार,कृषी.उ.बा.स संचालक सावली मुन्नाभाऊ स्वामी, युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे,युवा शहर अध्यक्ष अमर कोणपत्तीवार,जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी प्रशांत पाटील राईंचवार,नितीन दुवावार,नगरसेवक प्रितम गेडाम,सचिन संगीडवार,गुणवंत सुरमवार,नगरसेविका पल्लवी ताटकोंडावार,कृषी.उ.बा.स सावलीचे नवनियुक्त संचालक सुनील बोमणवार,प्रमोद दाजगाये,कांताबाई बोरकुटे, राजू पाटील ठाकरे तसेच दिलिप लटारे, श्रीकांत बहिवार आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार तालुकाध्यक्ष नितीन गोहने यांनी केले.

