कमलापूर ग्रामपंचायत मध्ये प्रथमच 1मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा…
विवेक मिरालवार
तालुका प्रतिनिधी अहेरी
संपूर्ण महाराष्ट्रात एक मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायत मध्ये आज दिनांक एक मे 2025 रोजी सरपंचा रजनीता मडावी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण केले. बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदाच कमलापूर ग्रामपंचायत मध्ये अति उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाला आरोग्य विभाग वन विभाग महसूल विभाग तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी उपस्थितांना संबोधन केले. कार्यक्रमाला जी. डी. शेंडे, एस एस मडावी,पी जी. समर्थ , जी वाय वाडगुरे, एम,पी मिसाळ,समीर शेख, ओ एस मगर, ए. बी. आतला, गौतमी नैताम, मंदा मडावी, व्ही व्ही एजुलवार, शारदा सुदीप रघुवार पंचकुला गोदारी,विठाबाई किसन भट,कलावती कोंडरावार, इंदुताई पेंदाम, पत्रकार श्रीधर दुग्गीरालापाटी, यस यस धरणी वार श्री एच आर पोरांलावार, संतोष मल्लेश बोमावार, मुख्याध्यापक आर एम आत्राम, एस एस तुरकर, के.बी.रणदिवे पी.पी चौधरी व शालेय विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…

