prabodhini news logo
Home चंद्रपूर ने.हि. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. सुभाष शेकोकर यांची निवड

ने.हि. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. सुभाष शेकोकर यांची निवड

0
116

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज

ब्रह्मपुरी : येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कार्य शारिरीक शिक्षण विभागाचे संचालक तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य राहिलेले डॉ. सुभाष शेकोकरांची निवड करण्यात आली.
नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया, सदस्य गोपाल भैया, कला शाखाप्रमुख डॉ राजेंद्र डांगे, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ रेखा मेश्राम, अधीक्षक संगीता ठाकरे, महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.डी. एच. गहाणेंकडून पदभार स्वीकारल्यानंतर ते महाविद्यालयाच्या (कार्य) प्राचार्यपदी विराजमान झाले. संस्थेचे सचिव अशोक भैया व संस्थेचे सदस्य गोपाल भैयांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. आपल्या काळात महाविद्यालय भर भराटीस यावे अशी मनोकामना व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एच गहाणे दि. ३० एप्रिल २०२५ ला सेवानिवृत्त झाले. यानिमित्त या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संचालन डॉ. मोहन कापगते तर आभार डॉ. धनराज खानोरकरांनी मानले. यावेळी नवनियुक्त कार्य प्राचार्यांचे पुष्पगुच्छ देऊन अनेकांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here